प्रतिनिधी/ सातारा
प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांच्यामुळे राज्यातील कला महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा निषेध सातारा जिह्यात कला शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. या आंदोलनात सातारा गौरी शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित कला महाविद्यालय पाटखळ माथा, कृष्णा कला महाविद्यालय वाठार,सातारा कला महाविद्यालय सातारा यांच्या कर्मचारी सहभागी झाले आहे.