तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या कुवारबाव येथे कलिंगड स्वस्त विकल्याच्या रागातून अन्य फळविक्रेत्यांनी कलिंगड विक्रेत्याला मारहाण केल़ी ही घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडल़ी एकनाथ नारायण म्हात्रे (41, शांतीनगर रत्नागिरी) हे या मारहाणीत जखमी झाले असून शहर पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
अंकुश वासुदेव म्हात्रे (28, तांबट आळी रत्नागिरी), मिथून शिंदे (25) व आकाश ढाले (25) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ म्हात्रे हे कुवारबाव येथे मुख्य रस्त्यावर कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतात़ ते स्वस्त दराने कलिंगड विक्री करत असल्याचा जाब विचारण्यासाठी संशयित आरोपी रविवारी रात्री त्यांच्या दुकानात गेले होत़े यावेळी एकनाथ म्हात्रे व संशयित आरोपी यांच्यात जोरदार बाचाबाची झाल़ी यातून एकनाथ यांना जमिनीवर खाली पाडून हाताच्या ठोशाने, लोखंडी सळीने मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े या प्रकरणी पुढील तपास सुरु आह़े