गिरीश मांद्रेकर /म्हापसा
मला लहानपणी गायक होण्याची खूप आवड होती. शिकण्याचेही मन होत होते. मात्र त्यावेळी परिस्थितीमुळे हू शकले नाही. शास्त्रीय गायन आपण शिकलो नाही याचे मला दुःख आहे. तरीपण जर आपल्यास वेळ मिळाला तर तेही शिकण्यास मागे राहणार नाही. खूप कलाकार गायन क्षेत्रातही आहेत. ते म्हणतात आपल्यास बेसीक शिकवतो मात्र ती संधी अद्याप मिळाली नाही. चित्रकार असतो त्याला चार पाच कला अवगत असते त्यासाठी कुठल्याही कलेला बैठक लागते. रियाजाप्रमाणे आमची ही रियाजच आहे. ही सदैव चालू राहील तर आम्ही अधिक बरे करू शकतो. आपण पैशाच्या आशेसाठी हे करीत नाही. जेव्हा कलेमध्ये व्यवसाय येतो, व्यवहारदृषअटी येते तेव्हा ती कला दृष्टीस येत नाही असा आपला विचार आहे अशी माहिती राज्यातील प्रसिद्ध चित्रकार तथा इन्स्टिटय़ूट मिनेझीस संस्थेचे माजी अध्यक्ष, भाजपा कार्यकारिणी सदस्य संजय हरलमकर यांनी दै. तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
संजय हरमलकर यांनी आपल्या निवासस्थानी देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा हुबेहुब मातीचा पुतळा आपली आवड व आपले जवळचे व्यक्तीमत्त्व व आपल्या कलेची क्षमता पाहण्यासाठी उभा केला आहे. या प्रतिनिधींनी त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हरमलकर यांच्या चित्रशाळेत कुचेली तीन माड येथे भेट दिली असता त्यांनी वरील माहिती दिली. हा पुतळा पाहण्यासाठी बघ्याची दिवसेंदिवस गर्दी येथे होताना पहायला मिळते.
आपल्या आनंदासाठी हा पुतळा तयार केला आहे. हे करीत असताना हा पुतळा प्रथमच करीत आहे ही भावना मनात ठेवून करीत असतो. आपण खूप केले आहे हे काहीच नाही असे नसून प्रत्येक कामातून आपण वेगळा अनुभव व अभ्यास घेत असतो व शिकत असतो. तो आपला प्रवास असतो. अशी माहिती संजय हरमलकर यांनी पुढे बोलताना दिली.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या इतका विकास राज्यात अन्य कुणी साधला नाही
स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा करण्यास कुणी लावला नाही. हे कमिशनाचे काम नाही. आपली पर्रीकर ही खूप आवडती व्यक्ती. आपण जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा भाजपा राज्यात नुकतीच वर येत होती. तेव्हापासून स्व. पर्रीकर यांच्याकडे आपला परिचय होता असे श्री. हरमलकर म्हणाले. तेव्हा आम्ही कुणलेही चांगले काम आम्ही बरोबरीने करीत होतो. ते अनेकवेळा आपल्या कार्यक्रमाला आले आहेत. त्यानंतर भाजपचे काम सुरू झाले व आमचे वेगळय़ारीत्या काम सुरू झाले. आज ते दिवंगत आहेत पण आपली आवडती व्यक्ती. जो विकास आज आम्ही पाहत आहेत आपल्यामते त्यांचा इतका विकास राज्यात कुणी साधला नाही. आपण भाजपात गेलो. 2003 मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी त्यांना सांगितले जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत मी तुमच्यासाठी मरून काम करणार आहे. एक अभ्यास म्हणून हा पुतळा केला. चेहऱयाचे काम करणे खूप कठीण असते. मातीचे काम आपण लहानपणापासून वडिलांबरोबर बसून करीत होतो असे खूपजण मला सांगत आहेत असे श्री. हमरलकर म्हणाले.
राजकारणामुळे काही काळ मातीच्या कामात खंड
आपण मातीचे काम शिकलो होतो मात्र राजकारणामुळे आपण ते काहीकाळ शिकू शकलो नाही. परशुराम 12 फूट मूर्ती, रायबंदर शेटय़े स्कूलचे संस्थापक, कळंगुट चर्चचे फादर आले. आग्वाद किल्ल्यात काम सुरू आहे मी जो वेळ आहे तो आत पुतळे करण्यास द्यावा असे ठरविले. आपले मित्र मदगी आहेत त्यांच्याशी बोलणी केली. सांगाडा घातला व हळूहळू आपण पर्रीकरांचा पुतळा तयार करण्याकडे लक्ष दिले अशी माहिती श्री. संजय हरमलकर यांनी दिली. हा पुतळा उभारण्यास तसा खूप त्रास असतो. अँगलमध्ये माती घालणे त्याची साईज बसविणे आदी गोष्टी. प्रथम खूप काही लावतात. माती लावतात व नंतर आकार देतात, स्वतःच्या अभ्यासासासाठी हा पुतळा आपण उभारला असे हरमलकर म्हणाले.
पूर्वीपासून आपली पर्रीकरांशी मैत्री
माझे बंधू भारतभूषण, संजय वालावलकर, मनोज वाळके त्यांच्याबरोबर ‘आरएसएस’मध्ये होते. ते बातम्या वाचत होते. ते आपल्या बंधूला म्हणाले, संजयला भेटायला पाहिजे. जे आपल्याकडे आले व आमची भेटही झाली. नंतर प्रत्येक होळीला ते येत होते. पूर्वी आमचे घर झोपडीवजा होते. ओपन जीपमध्ये कार्यकर्त्यांना घेऊन येत होते व रंगात आपल्यास आंघोळ घालीत होते. ते जरी भाजपचे मंत्री, आमदार, मुख्यमंत्री झाले तरी ते स्वतः खुर्च्या लावताना पाहिले होते. साधी राहणीमान व ते कार्यकर्ता म्हणून पाहत होते असे हरमलकर म्हणाले.
आपली क्षमता आहे की नाही यासाठीच चित्रकृती तयार केली
जर हा पुतळा चांगला झाला तर हा आपला अभ्यास आहे. आम्ही 25 जण आहोत. समोर मुलाला बसवून त्याची चित्रकृती तयार करतो. हा अभ्यास करण्यास आपल्याकडे क्षमता आहे की नाही हे पाहण्यासाठी पुढे आलो. विशेष म्हणजे आपली जी चित्रकृती झाली त्याचे उद्घाटन स्व. पर्रीकरांच्याचहस्ते झालेले आहे. प्रत्येकवेळी स्व. गोपाळराव मयेकर, प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, आपले गुरू दत्ता नावेलकर व स्व. पर्रीकर हे चार व्यक्ती आपले होते. तू पुढे सर मी येतो असे सांगून ते कितीही व्यस्त असले तरी ते येऊन जात होते असे हमरलकर म्हणाले.
50 हून अधिक पुतळे केले आहेत
हल्लीच राममनोहर लोहिया, टि.बी.कुन्हा. भारत माता आदी सहा पुतळे केले आहे. ते कालच आग्वाद येथे नेऊन बसवून आलो आहोत. अशी माहिती त्यांनी दिली. आवड म्हणून हे करीत आहे. गोव्याच्या भूमीत इतकी पेंटींग केली विविध क्षेत्रात त्याचा आपल्यास काहीच फायदा झाला नाही. गोव्यात मोठमोठे कलाकार होऊन गेले ज्यांना आज जग ओळखते. अशा माणसांची ओळख व गोव्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही ओळख म्हणून 50 व्यक्तीमत्त्वाची चित्रे करून ठेवली आहे. दुसऱयांना त्याचे महत्त्व नसल्यास चालेल पण आवड म्हणून ही कलाकृती पुतळे आपण करून ठेवले असल्याचे ते म्हणाले.
पुतळा उभारण्यास दोन महिन्याचा अवधी लागला
जवळ जवळ दोन महिने स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा उभारण्यासाठी वेळ लागला असून त्यात त्यांचे तोंड बनविण्यासाठीच एक महिन्याचा अवधी लागला असल्याची माहिती श्री. हमरलकर यांनी दिली. बारकाई, चारही बाजूनी करायला पाहिजे त्याला. अजून आठवडाभर जाईल असे हमरलकर म्हणाले. सध्या ही माती आहे. मातीपासून प्रथम मातीचे चित्रकृती करतात. दर दिवशी चेहऱयावर वेगळे भाव आलेले दिसतात. ही कलाकृती तयार झाल्यावर आपण ती सर्वप्रथम आपले गुरू तसेच अन्य काही तज्ञ कलाकारांना दाखविणार आहे. त्यांनी काही चेहऱयावर खोड काढल्यास ती कलाकृती पुन्हा बनविण्याकडे आपला कल असेल अशी माहितीही यावेळी चित्रकार श्री. हरमलकर यांनी दिली.