नवी दिल्ली
वीज क्षेत्रातील वितरण कंपनी कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने बिगर परिवर्तनीय रोखे (एनसीडी) सादर करत 200 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 10 लाख रुपयाच्या अंकित मूल्य असणाऱया 2,000 एनसीडी वर 200 कोटी रुपये प्राप्त करण्यात कंपनीला यश मिळाले असल्याचे म्हटले आहे.