प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव परिसरातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या कलाश्री बंब उद्योग समुहाच्या दुसऱया सोडतच्या भाग्यवान विजेत्या पिरनवाडीच्या कल्पना हंचीनमन्नी ठरल्या. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 200 गॅम चांदी देण्यात आली. गेली पंचवीस वर्षे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱया वस्तू ग्राहकांना माफक दरात पुरविल्या जाणाऱया या संस्थेने यापूर्वी दोन यशस्वी लकी ड्रॉ काढलेले आहेत. रोटरी क्लब साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, रोटरी क्लब चार्टर अध्यक्षा शितल चिलमी, लक्ष्मी को-ऑप. सोसायटीचे चेअरमन बळीराम पिंगट, सुभाष पवार व हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष शटुप्पा पाटील यांच्या उपस्थितीत व ग्राहकांच्या समोर तिसऱया ड्रॉतील दुसरी सोडत काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाश्री उद्योग समुहाचे प्रमुख प्रकाश डोळेकर होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना कलाश्रीने सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले असून विविध योजनांमुळे मध्यमवर्गीयांना थोडे थोडे पैसे गुंतवून मनपसंत आणि खात्रीशीर वस्तू माफक दरात घेता येत असून यापुढे आता त्यांनी दररोजच्या वापरातील सर्व किराणा योग्य दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ग्राहकांची चांगली सोय केल्याने त्यांचे कौतुक केले. याचबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असून सर्वसामान्य 75 पेक्षा जास्त नागरिकांचे मोतीबिंदू ऑपरेशन, महिलांसाठी वैद्यकीय बिलामध्ये गिझरे हॉस्पिटलमध्ये सवलत, डॉ. मनोज सुतार यांचे स्माईल केअर सेंटरमध्ये सवलतीत उपचार विद्यार्थ्यांना तसेच विविध स्पर्धांना, मंदिरांना मदत, कोरोनाकाळात शेतकऱयांकडून भाजीपाला खरेदी करून गरजूंना वाटप तसेच 650 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण असे उपक्रम जोपासले आहेत. नागरिकांच्या हितातच ते आपले समाधान मानतात. 300 पेक्षा जास्त जणांना रोजगारही उपलब्ध केला असल्याचे मनोगतातून सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात डोळेकर यांनी केवळ महिना 600 गुंतवणूक करून 15 महिन्यांनंतर 10000 रुपयांची गृहोपयोगी वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असून या कालावधीतील 15 भाग्यवान ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळणार असून 15 व्या भाग्यवान विजेत्याला कार मिळणार आहे. या योजनेत ग्राहकांच्या मागणीमुळे दोन सोडती होऊनही पहिले तीन हप्ते 2 फेब्रुवारी पर्यंत भरून सहभागी होता येणार आहे. तसेच सभासदांना 20 रुपये दराने 5 किलो साखर मिळणार असेही त्यांनी यावेळी सांगितले व 15 हप्ते एकाचवेळी भरलेल्या सभासदांचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाश्री उद्योग समुहातील कार्यतत्पर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. टी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.