सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी शाळेच्या समोरील परिसरात कोरोना झाल्याच्या नैराश्यातून युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. युवकाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली असून, मुतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अण्णासाहेब कल्याणी शाळेच्या समोरील परिसरात कोरोनाबाधित युवकाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी जवळ पाहणी केली असता त्याच्याजवळ साडपलेल्या चिठ्ठीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याने नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.