नवी दिल्ली
दागिन्यांच्या व्यवसायात नाव कमावू पाहणाऱया कल्याण ज्वेलर्सचा लवकरच आयपीओ बाजारात आणला जाणार असल्याचे सांगण्यात येते. आयपीओ आणण्याकरीता आवश्यक ती परवानगी कल्याण ज्वेलर्सला मिळाली आहे. प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्स 1 हजार 750 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओसाठी सेबीने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत 1 हजार कोटी रुपयांचे समभाग सादर केले जाणार आहेत.