मुंबई –
दागिनांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया कल्याण ज्वेलर्सने 31 मार्च 2021 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीअखेर नफ्यामध्ये 60 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या दागिन्यांना दरम्यानच्या काळामध्ये ग्राहकांनी चांगली मागणी नोंदवली आहे. त्यामुळेच कंपनीच्या नफ्यामध्ये 60 टक्क्याची घसघशीत वाढ दिसली आहे. मागच्या वर्षाच्या समान कालावधीतील तुलनेमध्ये ही वाढ नोंदवली गेली आहे. नव्या वर्षात पहिल्या दोन महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कल्याण ज्वेलर्सकडून 35 टक्के इतका नफा नोंदवला गेला होता.