प्रतिनिधी / बेळगाव
मुंबई-कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ज्वेलर्स बँडने आज सणासुदीच्या हंगामासाठी भव्य ऑफर्स जाहीर केल्या. हा दिवाळी कार्निव्हल 45 दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील सर्व शोरुम्समध्ये सुरू राहणार आहे. सिझन सेलदरम्यान ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही शोरुममध्ये उपलब्ध दागिन्यांवर आकर्षक सवलती मिळणार
आहेत.
सणांच्या आगामी काळासाठी कल्याण ज्वेलर्समधील सर्व प्रकारच्या दागिने खरेदीवर घडणावळीवर 25 टक्क्मयांपर्यंत सवलत मिळणार आहे. स्टोन्सच्या मूल्यावर थेट 25 टक्के सवलत मिळणार असून ती किमान एक लाख रुपये किमतीच्या स्टोन खरेदीवर लागू असेल. ग्राहकांना भारतातील कल्याण ज्वेलर्सच्या सर्व शोरुम्समध्ये आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येईल. अशा प्रकारच्या पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेल्या ऑफर्स 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील.
या शुभप्रसंगी कल्याण ज्वेलर्सने कल्याण स्पेशल गोल्ड रेट सुरू केला असून त्या अंतर्गत कंपनीच्या भारतातील सर्व शोरुम्समध्ये सोन्याच्या किमतीचे प्रमाणीकरण केले जाणार आहे.
कंपनीचे आश्वासन
कल्याण स्पेशल गोल्ड रेट बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीपेक्षा कमी असेल, असे आश्वासन कंपनीने दिले असून ग्राहकांना त्यांच्या दागिने खरेदीवर तत्काळ लाभ मिळणार आहे.
नव्या शोरुमच्या लाँचप्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणारामन म्हणाले, नवरात्री, दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळी, धनत्रयोदशीपर्यंत लागोपाठ सणांची रेलचेल असल्यामुळे सोने खरेदीसाठी हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो. कल्याण ज्वेलर्समधील दागिने बीआयएस हॉलमार्क्ड व शुद्धतेच्या विविध चाचण्या पूर्ण केलेले
असतात.
ग्राहकांना कल्याण ज्वेलर्समध्ये 4 स्तरीय ऍश्युरन्स प्रमाणपत्रही दिले जाते, ज्यामुळे त्यांना शुद्धतेची खात्री मिळते. आजन्म दागिन्यांची मोफत देखभाल, उत्पादनाची तपशीलवार माहिती, पारदर्शक एक्स्चेंज आणि बाय-बॅक पॉलिसी मिळते. हे प्रमाणपत्र ब्रँडच्या नि÷ावान ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या बांधिलकीचा भाग आहे.