ऑनलाईन टीम / कल्याण :
कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आज अखेर निधन झाले.
कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. सलग चार वेळा देवळेकर हे मोठ्या मतांनी निवडून आले होते. 2015 मध्ये विजयी झाल्यावर त्यांची महापौर म्हणून निवड करण्यात आली होती. त्या काळात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली होती. विकास कामात त्यांनी मोठे योगदान दिले.