घटप्रभा पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
कल्लोळी (ता. गोकाक) येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटप्रभा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
श्रुती निलकंठ कप्पलगुद्दी (वय 29, रा. कल्लोळी) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक निलकंठ कप्पलगुद्दी यांच्या त्या पत्नी होत. तर निवृत्त पोलीस निरीक्षक डी. सी. लक्कण्णावर यांची ती मुलगी होत. शुक्रवार दि. 29 जानेवारीच्या रात्री 10.15 ते शनिवारी सकाळी 10.15 यावेळेत ही घटना घडली आहे. मारिहाळ येथे श्रुतीचे माहेर होते. या घटनेची माहिती समजताच माहेरवासीयांनी कल्लोळीला धाव घेतली. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटप्रभा पोलीस पुढील तपास करीत आहेत.