म्हापसा / प्रतिनिधी :
विदेशात आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत राज्यात बेकायदा सट्टेबाजीत गुंतलेल्यांची एकुण सहा प्रकरणे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेली असून त्यापैकी एकटय़ा कळंगुटातच चार प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती स्थानिक पोलिस कक्षाकडून मिळाली आहे.
सोमवारी रात्री कळंगुट पोलिसांकडून कांदोळीतील ओशियो इन हॉटेलात घातलेल्या छाप्यात आंध्रप्रदेश येथील चौघांना आयपील वरुन सट्टेबाजीत गुंतलेल्या अन्य चार तरुणांना ताब्यात घेतले. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पोलिसांनी अत्यंत चपळाईने कांदोळीतील ओसियो-इन हॉटेलचा सर्वप्रथम ताबा घेत तेथील आलिशान खोलीत कोलकाता नाईट राईडर्सा आणी रॉयल चेलेंजर्सा -बंगळुरु यांच्यात दुबई येथे खेळल्या जाणाऱया क्रिकेट स्पर्धेवरुन सट्टेबाजीत दंग असलेल्या आधुरी नागा राजु (42) इरिंकी व्ये??कटा गणेश (20) पिटानी किशोर कुमार (42) तसेच रुद्रा सुर्यनारायण राजु (39) यांच्या मुसक्मया आवळल्या. यावेळी संशयित आरोपींच्या ताब्यातील रोख रक्कम 15785, 32 महागडे मोबाईल संच, कॉन्फरन्स बॉक्स तसेच दोन लेपटॉप मिळून अंदाजे पाच लाखांचा दस्तऐवज जप्त केला.
दरम्यान, जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व चारही आरोपी विरोधात कळंगुट पोलिसांकडून रितसर गुन्हा? दाखल करण्यात आला असून संशयितांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, आयपील स्पर्धेच्या अनुषंगाने बार्देशातील किनारी भागातील बेकायदा सट्टेबाजीत गुंतलेल्यांच्या विरोधात कळंगुट पोलिसांकडून करण्यात आलेली ही चौथी कारवाई होती. या कारवाईत कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक सुशांत सांगोडकर, हेड कॉन्स्ट?बल विनोद नाईक तसेच कॉन्स्ट?बल विनय श्रीवास्तव आदींनी भाग घेतला. वरि÷ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जारी आहे..