कळंगुटमध्ये आगीच्या मालिका सुरूच
प्रतिनिधी /म्हापसा
निओ कळंगूट बीच रिसोर्ट कळंगूट समुद्र किनाऱयावर जाणाऱया वाटेतच असलेल्या कपडय़ाच्या गोदामाला आग लागून या आगीत सुमारे 1 कोटीहून अधिक रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान लागली. आगीमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आग नेमकी कशी लागली याबाबत पोलीस वर्ग पंचनामा करीत आहे.
निओ कळंगूट बीच रिसोर्टला लागूनच असलेल्या या कपडय़ाच्या गोदामाला ही आग लागली. आतमध्ये तीन मजल्यावर कपडे भरून ठेवले होते. जितेंद्र भगदानी यांच्या मालकीचा हा गोदाम असून तिन्ही मजल्यावर या गोदामात नवीन विकण्याचे कपडे भरून ठेवले होते. संपूर्ण उत्तर गोव्यात येथील कपडे विक्रीस जात असून हे कपडे घाऊक दराने दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार मालक भगदानी यांनी यासाठी स्थानिक पंचायत वा अग्निशमन दलाचा कोणताही परवाना घेतलेला नाही. त्यामुळे रिसोर्ट मालकांनी पत्रकारांनाही आतमध्ये घेण्यास मज्जाव केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ब्रिथींग ऍपीअर घालून धुरातून वाट काढीत सामान बाहेर काढून आग विझविली.
म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी अशोक परब, आनंद नाईक, स्वप्नेश कळंगुटकर, अशोक वळवईकर, जयेश कांदोळकर, नितीन चोडणकर, आशीर्वाद सातार्डेकर, प्रवीण गांवकर, संजू कोरगावकर, पीळर्ण अग्निशणन दलाचे अधिकारी रुपेश सावंत, अपअधिकारी प्रदीप मांद्रेकर, रुद्रेश पांढरे, लाडू सावंत, रामा नाईक, आनंद बांदेकर, निलेश गावडे, समीर शेटय़े, विशाल पाटील, निखिल गांवस, जितेंद्र बळी, विराज कांदोळकर यांनी बरेच परिश्रम घेतले.