प्रतिनिधी /म्हापसा
शनिवारी रात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान मोटारसायकल व टँकर यांच्या कळंगूट डॉल्फीन सर्कल येथे झालेल्या अपघातात मुड्डावाडा-साळगाव येथील मयूर महादेव उगवेकर (17) हा जागीच ठार झाला. मयूरने टँकरला मागून ठोकर दिल्याने तयाचे डोके आपटून तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मागे बसलेला अमन शिरोडकर (साळगाव) हा गंभीर जखमी असून त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह चिकित्सेनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन केला.