आठवड्यात कोरोना बांधीत कैद्यांच्या संख्येच्या वाढीचा वेग वाढला
राजेंद्र होळकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संख्येत दिवसेन दिवस वाढ होत चालली आहे. त्याचपध्दतीने कळंबा कारागृह आणि बिंदु चौकातील उप कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागल्याने, आतापर्यत ( ३ सप्टेंबर ) ८२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात इतक्या संख्येने कैद्यांना कोरोनाचा फैलाव झाल्याने कळंबा आणि बिंदु चौकातील उप कारागृहामधील बंदीजनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना ससंर्गजण विषाणूच्या महामारीच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील सर्व कारागृहामधील सात वर्षापर्यत शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. तर गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात सध्या शिक्षा भोगत आहेत. पंधरा दिवसापूर्वी सांगली कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने कळंबा व बिंदू चौक उप कारागृहात शिक्षा भोगत कैद्यांची
स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासाअंती उघडकीस आले. यांची दखल घेवून कारागृह प्रशासनाने कारागृहातील सर्वच कैद्यांची स्वॅब तपासणी केली जावी, असे पत्र सीपीआर हॉस्पीटल प्रशासनाला देण्यात आले. २८ ऑगस्टला २५० कैद्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७ कैद्यांना कोरोणाची लागण झाल्याचे समोर आल्याने दहा दिवसामध्ये कोरोना बाधीत कैद्यांची संख्या ४२ वर जावून पोहचली.
दिवसेन दिवस कळंबा व बिंदू चौक उप कारागृहातील कोरोनाची बाधा झालेल्या कैद्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. बुधवार { २ सप्टेंबर } रात्रीपर्यत या दोन कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा फैलाव झाल्याची संख्या ८२ इतकी झाली आहे.
या कोरोना बांधीत कैद्यांच्यामध्ये सर्वाअधिक वयोवृध्द कैदी आहेत. त्यासर्व कोरोना बांधीत कैद्यांच्यावर कळंबा येथील आयटीआयमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातील मधील स्वतंत्र विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून, सर्वाची प्रकृती स्थीर आहे. तसेच कळंबा कारागृहातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.