एक कैदी जखमी, तिघेही साताऱयाचे, कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी/कोल्हापूर
कळंबा कारागृहात दोन कैद्यांनी पूर्व वैमनस्यातून एका कैद्यावर खिळÎाने प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मकरंद ऊर्फ मारुती बाबासो मोटे (वय 46, खंडाळा, जि. सातारा) हा कैदी जखमी झाला. त्याच्यावर सहा टाके पडले आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
मकरंद मोटे हा खुनाच्या गुन्हÎात कळंबा कारागृहात आहे. तर मेहुल संदीप पाटील (रा. इंदिरानगर लोणंद जि. सातारा) आणि विराज ऊर्फ बापू विजयकुमार गरुड (रा. पाडेगाव ता. फलटण, सातारा) हे दोघेही खुनाच्या गुन्हÎात कारागृहात आहेत. यापुर्वी मकरंद याने कारागृहाबाहेर असताना, इतर दोन कैद्यांच्या नातेवाईकाला मारहाण केली होती. या पूर्ववैमनस्यातून गुरुवारी सकाळी आठ वाजता पाटील आणि गरुड यांनी मोटेवर हल्ला केला.
गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मकरंद मोटे याला या दोघांनी व्हिजिटिंग कार्डवरील मोबाईल क्रमांक दाखवण्याच्या बहाण्याने बरॅकीच्या बाहेर बोलावून घेतले. यानंतर त्यापैकी एकाने मोटे याला पाठीमागून पकडले तर दुसऱयाने त्याच्या गळÎावर खिळÎाने वार केला. यामध्ये मोटे हा जखमी झाला. त्याला सहा टाके पडले आहेत. मोटे याला उपचारानंतर कारागृहातच आणले आहे. मेहुल पाटील आणि विराज गरुड या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खिळा पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक फौजदार विजय कोळी तपास करत आहेत.
कळंबा कारागृहात सतत चर्चेत
पंधरा दिवसापूर्वी कळंबा कारागृहात गांजा पोहोचवताना जुना राजवाडा पोलिसांनी पुण्यातील तिघांना अटक केली होती. चेंडू फोडून त्यामध्ये गांजा भरुन पुन्हा तो चिकटवून क्रिकेट खेळण्याचा बहाणा करत त्यांनी गांजा आतील कैद्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या घटनेच्या दुसऱया दिवशी कारागृहात मोबाईल सीम कार्ड सापडले होते. तर गुरुवारी दोघा कैद्याकडून दुसऱया कैद्यांवर
प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यामुळे कारागृह प्रशासन करते काय? अशी चर्चा होत असून सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.