दोडामार्ग – वार्ताहर-
उद्या15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी होऊ घातलेल्या कळणे ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाला राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाऊस्कर यांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त कळणे वासियांना योग्य भरपाई मिळवून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.