उपनगराध्यक्षपदी बद्रुद्दिन शिरोळकर यांची निवड
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
कवठेमंहाकाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी पाटील तर उपनगराध्यक्षपदी बद्रुद्दिन शिरवळकर यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.