कसबा बीड / प्रतिनिधी
कसबा आरळे, ता. करवीर येथील अनिल सर्जेराव पाटील (वय २५) या युवकाने शनिवार ( दि.९) रोजी सायंकाळी उशिरा राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल पाटील हा युवक एमआयडीसी येथे नोकरी करत होता. गेले वर्षभर कंबर दुखीचा त्रास सुरू होता. या आजाराने त्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली. त्याला अत्यावस्थ अवस्थेत कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारा अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. अनिल हा मनमिळाऊ स्वभाव असलेल्या त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.अनिल सर्जेराव पाटील यांची आत्महत्या नोंद करवीर पोलिसांत झाली असून पुढील तपास चालू आहे.