ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोना उगमस्रोताच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) पथक 3 फेब्रुवारीला वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये दाखल झाले आहे. महिनाभरात या पथकाने कोरोनाचा उगम, त्याचा पसार आणि नवनवीन प्रकाराबाबत अभ्यास केला. या पथकाचे कोरोनावरील संशोधन जवळपास पूर्ण झाले असून, 15 मार्चला WHO यासंदर्भात अहवाल सादर करणार आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसिस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
17 नोव्हेंबर 2019 रोजी चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलला. त्यानंतर वुहानमधून कोरोनाचा प्रसार जगभरात झाला. WHO च्या पथकाने वुहानमध्ये कोरोनाच्या जेनेटिक्सचा अभ्यास केला. त्यानुसार डिसेंबर 2019 मध्येच वुहानमध्ये 13 प्रकारचे कोरोना विषाणू आढळल्याचे समोर आले. 15 मार्चला यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर होणार आहे.