जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा नवोदित यष्टीरक्षक आणि फलंदाज 22 वर्षीय काईल व्हिरेनी याचे कसोटी क्रिकेट खेळण्याचे ध्येय आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधीत्व करणे हे माझे अंतिम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन व्हिरेनीने केले. यष्टीरक्षक व फलंदाज व्हिरेनीने 3 वनडेत द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करताना 101 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने हे तीन वनडे सामने खेळले असून त्याने एक अर्धशतक झळकविले आहे. या तीन वनडे सामन्यात व्हिरेनीने 48, 3, 50 धावा जमविल्या आहेत. यजमान दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली ही वनडे मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली आहे.
यानंतर भारताविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये व्हिरेनीचा समावेश करण्यात आला होता. पण कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर ही मालिका रद्द करण्यात आली होती.