दुबई : नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकनात ऑस्ट्रेलियाने आघाडीचे स्थान मिळविले असून भारत तिसऱया स्थानावर फेकला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने अलिकडेच इंग्लंडविरूद्धची ऍशेस मालिका 4-0 अशी एकतर्फी जिंकल्याने त्यांनी या मानांकनात अग्रस्थानवर झेप घेतली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका 1-2 अशी गमवावी लागली. ऑस्ट्रेलिया 119 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱया स्थानावर आहे. भारत तिसऱया, इंग्लंड चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या, पाक सहाव्या स्थानावर आहेत.