दिवसा दुरुस्ती करण्यात येत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे पुन्हा खराब : रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेतील रस्त्यांची दुरवस्था झालेल्या मोजक्मयाच गल्ल्यांमध्ये खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात आली होती. उर्वरित खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. पण शुक्रवारी सिमेंट काँक्रिट घालून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खड्डे बुजविण्याचे काम दिवसा करण्यात येत असल्याने वाहनांच्या फेऱयांमुळे खड्डय़ांमधील सिमेंट उखडून जात असल्याने केलेले काम वाया गेले आहे.
शहर व उपनगरातील प्रमुख रस्त्यांचे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण केले होते. पण बाजारपेठेतील रस्त्याच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी प्रत्येक रस्त्यावर चरी आणि खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे रहिवाशांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. बसवाण गल्लीसह विविध परिसरातील रस्त्यांवरील खड्डे डांबर घालून बुजविण्यात आले होते.
काही मोजक्मयाच गल्लीच्या रस्त्यावरील खड्डय़ांची दुरुस्ती करून काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेच्या अर्धवट कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच अन्य गल्लीतील खड्डे बुजविण्याचे काम करण्याची मागणी करण्यात आल्याने महापालिकेच्यावतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
खड्डे बुजविण्याचे काम रात्रीच्यावेळी करा
रामदेव गल्ली परिसरातील खड्डय़ांमध्ये सिमेंट काँक्रिट घालण्यात येत आहे. सदर काम शुक्रवारी सकाळी करण्यात आले. पण रस्ते सकाळच्या सत्रात बुजविल्याने वाहनांच्या गर्दीमुळे घातलेले सिमेंट काँक्रिट उखडून गेले आहे. रामदेव गल्लीतील रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे घातलेले काँक्रिट वाया गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खड्डे बुजविण्याचे काम रात्री करून रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित करावी, अशी मागणी होत आहे.