प्रियंका वड्रा यांना नवा झटका : पल्लवी सिंह यांचा भाजपप्रवेश
उत्तरप्रदेश विधार्नांसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यापूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. काँगेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ची आणखी एक पोस्टर गर्ल भाजपमध्ये सामील झाली आहे. पल्लवी सिंह यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये सामील झालेल्या पल्लवी सिंह या तिसऱया पोस्टरगर्ल आहेत. यापूर्वी प्रियंका मौर्य अणि वंदना सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
डॉक्टर प्रियंका मौर्य यांनी प्रियंका वड्रा यांच्या सचिवावर तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. लडकी हूं, लड सकती हूं परंतु तिकीट मिळवू शकत नाही. काँग्रेसमधील जातीयवादामुळे आमदार नरेश सैनी यांना पक्ष सोडावा लागला. काँग्रेसमधील गैरप्रकारांबद्दल बोलण्याची कुणामध्येच हिंमत नसल्याचा मौर्य यांनी केला होता.
403 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दुसऱया टप्प्यासाठी 14 फेब्रुवारी, तिसऱया टप्प्यासाठी 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यासाठी 23 फेब्रुवारी, 5 व्या टप्प्यासाठी 27 फेब्रुवारी, 6 व्या टप्प्यासाठी 3 मार्च आणि 7 व्या टप्प्यासाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे.