ऑनलाईन टीम / मंदसौर :
केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेसचा विरोध असतानाच मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने या कायद्याचे समर्थन केले आहे.
हरदीप सिंह डांग असे या आमदाराचे नाव आहे. डांग हे मध्यप्रदेशातील मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध आहे. मात्र, डांग यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. ते म्हणतात, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील पीडित नागरिकांना भारतात चांगल्या सुविधा मिळत असतील तर त्यात वाईट काय आहे. पण जे लोक पिढ्यानपिढ्या भारतात राहतात, त्यांच्याकडे एनआरसी अंतर्गत कागदपत्रे मागितली जात आहेत, त्यावर सरकारने विचार करावा.
तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याकडे राष्ट्रीय नागरिक नोंदणीपेक्षा वेगळय़ा दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असेही डांग म्हणाले.