प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसची मातब्बर नेतेमंडळी गुरुवारी अरभावी, गोकाक मतदारसंघामध्ये गेली होती. त्यांनी बेळगाव शहरासह दक्षिण आणि उत्तर मतदारसंघामध्ये प्रचार केला. घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी हा प्रचार केला आहे. शहरातील वडगाव, शहापूर परिसरात प्रचार करण्यात आला आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील येळ्ळूरसह इतर गावांमध्ये प्रचार करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सतीश जारकीहोळी यांच्यासारखा स्वच्छ चेहरा नाही. तेव्हा आता सर्वांनी ठामपणे त्यांच्या पाठिशी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनीच कॉर्नर सभा घेतल्या. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन प्रचाराबाबत नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.
स्पीकरद्वारेही ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला आहे. एकूणच काँग्रेसचे कार्यकर्ते सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या या प्रचारामध्ये मोठय़ा प्रमाणात सर्वसामान्य जनता भाग घेत आहे. त्यामुळे प्रचारफेऱया भर उन्हातही मोठय़ा प्रमाणात निघत आहेत. सध्या तरी सतीश जारकीहोळी यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
यावेळी जयराज हलगेकर, किरण पाटील, परशराम ढगे, राजन हुलबत्ते यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.