बेंगळूर/प्रतिनिधी
गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभा विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून पक्षाने यासंदर्भात उच्च सदन सभापतींना पत्र लिहिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
खारगे यांना आझाद यांच्या सेवानिवृत्तीनंतर विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्यासाठी कॉंग्रेसने राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून १५ फेब्रुवारी रोजी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होईल. आझाद जम्मू-काश्मीरमधील उच्च सदनाचे सदस्य आहेत.
कर्नाटकमधील दलित नेते असलेले खरगे हे २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेत कॉंग्रेसचे नेते होते.