काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडुराव यांचे आवाहन : कुंभारजुवे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कुंभारजुवा मतदारसंघातील जुने गोवे येथे कुंभारजुवा गट प्रमुख विशाल वळवईकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी गट समितीला व कार्यकर्त्याना त्यांनी मार्गदर्शन केले.
कुंभारजुवा गटाने सदस्यता मोहीम चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे. अजून नवीन सदस्य व जुने काँग्रेस कार्यकर्ते, हितचिंतक यांना सदस्य करून घेणे तसेच एखाद्या चांगल्या योग्य व्यक्तीकडे मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी देणे. आज लोक सोशल मीडियाचा जास्त वापर करताना आढळतात. तेव्हा आपल्या पार्टीचे ध्येय, धोरण कार्यक्रम व भविष्याची वाटचाल सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे, असे दिनेश गुंडूराव म्हणाले.
मागच्या निवडणुकीत लोकांनी भाजपला जनादेश दिला नव्हता. लोकांनी काँग्रेसला कौल दिला होता. भाजपने तो कौल मागच्या दारातून पळवून सरकार स्थापन केले. जे लोकमान्य नसून या सरकारला नैतिक व सामाजिक अधिकार नाही. हे सरकार लोकशाहीचा अपमान करून सत्तेवर आलेले सरकार आहे. तेव्हा येणाऱया निवडणुकीत पुंभारजुवा मतदारसंघातून पुन्हा काँग्रेसचा आमदार होणे गरज आहे.
गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, कुंभारजुवा गट खूप सक्रिय असून लोकांना त्यांनी हव्या त्या पद्धतीने मदत केलेली आहे. गटातर्फे बैठका व इतर कार्यक्रम नियमित राबवले जातात. तेव्हा सदस्यता मोठय़ा प्रमाणावर आणली पाहिजे. तेव्हाच मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी आम्हाला सहज शक्य होईल.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, अनेकवेळा कुंभारजुवा मतदारसंघात फिरकलेले आहेत आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ जिंकू शकतो. फक्त लोकांनी आठवण ठेवायची गरज आहे की भाजपने गोव्याला अधागतीला आणले आहे. ऑक्सिजन अभावी लोक तडफडून मृत्यूमुखी पडले आहेत तर कुणी हॉस्पिटलमध्ये खाटा व योग्य तऱहेचे उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडलेले आहेत. तेव्हा लोकांनी भाजपच्या भुलथापाना बळी न पडता येणाऱया निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे.
पक्ष समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोकांनी आपल्या अडचणी व विचार पक्षाच्या पदाधिकाऱयांसमोर मांडल्या. स्वागत विशाल वळवईकर यांनी केले तर आभार विवेक पिंटो यांनी मानले. प्रमुख कार्यकर्ते मोठय़ा संख्येने कोरोना नियमांचे पालनक करून उपस्थित होते. तसेच या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख यांची उपस्थिती होती.