किशोर उपाध्याय यांना टिहरीची उमेदवारी
उत्तराखंड काँग्रेसचे माजी अध्यक्ष किशोर उपाध्याय यांना पक्षविरोधी कारवायांसाठी 6 वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले. प्रथम शिस्तभंगाच्या कारवाईच्या स्वरुपात त्यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर किशोर उपाध्याय यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना टिहरी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी यापूर्वी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. याप्रकरणी पक्षाने त्यांना प्रदेश समन्वय समितीच्या अध्यक्षपदासह सर्व पदांवरून हटविले होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी देवेंद्र यादव यांनी उपाध्याय यांना पत्र लिहून सरकार विरोधातील काँग्रेसची लढाई कमकुवत केल्याचा आरोप केला होता.
ज्योति रौतेला यांना जबाबदारी
काँग्रेसने ज्योति रौतेला यांना राज्य महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सरिता आर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर हे पद रिक्त होते. तरकमलेश रमन, अलका पाल, भगिरथी बिष्ट आणि मनोरमा डोबरियाल शर्मा यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.