बेंगळूर/प्रतिनिधी
काँग्रेसचे शिवाजीनगरचे आमदार रिझवान अरशद यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वतः अरशद यांनी ट्विटरवर कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये त्यांनी “मी गेल्या चार दिवसांपासून स्वत: ला इतरांपासून अलग केलं होत. मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. यामध्ये माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे हे कळाल्यानांतर मला खूप आनंद झाला. “सर्वांनी मी बरे होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा आणि केलेली प्रार्थना याबद्दल मी धन्यवाद देतो. तसेच सर्वांनी सुरक्षित राहा ही विनंती करतो असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.