ऑनलाईन टीम / मुंबई :
विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित रिक्त असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे.
उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. मात्र, काँग्रेसने विधान परिषदेवर जाणार का? अशी विचारणा केली असता उर्मिलाने स्पष्टपणे नकार दिला आहे, असा गौप्यस्फोटकाँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ते म्हणाले की, आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्यांचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उर्मिला मातोंडकर 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.