ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी दिवंगत नेते आणि माजी खासदार अहमद पटेल यांनी पक्षाचे कोषाध्यक्षपद सांभाळले होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी हंगामी उपाय म्हणून बन्सल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. 72 वर्षीय पवनकुमार हे 10, 13, 14 आणि 15 व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
मनमोहन सिंग सरकारमध्ये बन्सल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि जलसंपदा मंत्रालयाचेही काम त्यांनी पाहिले आहे. ते केंद्रीय रेल्वेमंत्रीही होते, मात्र, त्यांचे पुतणे विवेक सिंगला यांच्यावर लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर त्यांना 3 मे 2013 रोजी या पदाचा राजीनामा द्यावा लागला.