कोलकाता/ वृत्तसंस्था
येत्या 20 तारखेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असे या पक्षाने स्पष्ट केले आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहू शकतात. या बैठकीत सत्ताधारी भाजप व रालोआ विरोधात विरोधकांची आघाडी बनविणे, पेगॅसिसचा मुद्दा, नवे कृषी कायदे, कोरोना परिस्थिती, इत्यादी विषयांवर चर्चा शक्य आहे, असे सांगण्यात आले. या बैठकीला द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा इत्यादी पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.