वेगाने तयारी सुरू असल्याचा मिस्त्राRचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाला सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती काँग्रेस संघटन निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्राr यांनी दिली आहे. निवडणुकीसंबंधी पक्षांतर्गत तयारी वेगाने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या सोनिया गांधी सांभाळत आहेत. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान निवडणूक होणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली होती.
अध्यक्षाची निवडणूक सप्टेंबरपर्यंत होणार आहे. आम्ही वेळेत काम संपविणार आहाहेत. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक बोलाविली जाईल, ज्यात काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीसंबंधी निर्णय होणार असल्याचे मिस्त्राr म्हणाले. परंतु अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचे नाव आघाडीवर आहे का असा प्रश्न विचारण्या आला असता उत्तर देणे टाळले आहे.
अध्यक्ष म्हणून कुठल्याही एकाचे नाव घेऊ शकत नाही. किती लोक निवडणूक लढवत आहेत त्यावरच निवडणुक कशी होणार हे अवलंबून असल्याचे मिस्त्राr यांनी सांगितले आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक ऑक्टोबरमध्ये झाली होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह अनेक मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली होती.
पक्षप्रमुखाची निवडणूक पुढील वर्षी 21 ऑगस्ट आणि 20 सप्टेंबरदरम्यान आयोजित केली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली होती. सदस्यत्व मोहीम 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत 31 मार्चपर्यंत चालणार आहे. तर ब्लॉक समित्यांची निवडणूक 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे.