ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज सायंकाळी सात वाजता सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी दिली.
अधिक माहिती देताना पुुढे ते म्हणाले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अध्यक्ष सोनिया गांधी यांना याआधी दोन फेब्रुवारी रोजी देखील पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, आज काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत त्यांनी कोरोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा केली होती. या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सह पक्षाचे प्रमुख नेते देखील सहभागी झाले होते.