ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते स्वतः च्या घरात क्वारंटाइन आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंघवी यांना थोडा ताप होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या पत्नीची देखील कोरोना चाचणी केली असता त्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सिंघवी यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मुलगा तसेच त्यांच्या घरातील अन्य सदस्य आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. सिंघवी हे काँग्रेसमधील दुसरे नेते आहेत ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याआधी काँग्रेस नेता संजय झा यांना कोरोनाची लागण झाली होती.