ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
काँग्रेस नेता आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आले. मागील काही दिवस माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
तरुण गोगोई 2016 मध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी 15 वर्ष मुख्यमंत्री होते. आसाममध्ये 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सत्ता परत यावी यासाठी गोगोई मागील काही दिवसांपासून दौरा करत होते.
याआधी आसामचे डी जीपी भास्कर ज्योती महंता आणि कामरूप उपायुक्त बिस्वजीत पेगू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.