ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः ला क्वारंटाइन करून घेतले आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची चाचणी करून घ्यावी. तसेच कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोती लाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरुण गोगोई आणि आरपीएन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना संसर्ग झाला होता.