नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपचे उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी यांनी आज सकाळीच जितिन प्रसाद भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली होती.