प्रतिनिधी / सोलापूर
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मकबूल मोहोळकर यांना काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले. त्यामूळे काँग्रेस पक्ष मजबुतीकरनासाठी मकबूलमोहोळकर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
जेष्ठ नेते, माजी नगरसेवक मकबूल मोहोळकर यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. परंतू पक्षाच्यावतीने तो राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मकबूल मोहोळकर यांना काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचा आदेश मानुन जेष्ठ नेते माजी नगरसेवक मकबूल मोहोळकर, बाबा मोहोळकर, ताजोद्दीन मोहोळकर हे गुरुवारी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, हाजी तौफीक हत्तुरे, व इतर मान्यवर उपस्थित होते.