प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱया पावसामुळे काँग्रेस रोडवर मिलिटरी महादेव मंदिरासमोर पाणी साचून स्वीमिंग पूलचे स्वरुप आले आहे. रस्त्यावर दीड फूट पाणी साचल्याने दुचाकींसह अन्य वाहनांना मार्ग काढणे कठीण बनले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी दुभाजक फोडून पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाणी कमी झाले नाही. अखेर ड्रील मशीनने दुभाजक हटवून पाणी जाण्यासाठी मार्ग करण्यात आला.
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नाल्यामधील अडथळय़ांमुळे मागील वषी काँग्रेस रोडवर पाणी आले होते. मात्र, यंदा सर्व ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असताना मिलिटरी महादेव मंदिरसमोर पाण्याचा निचरा झाला नाही. या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी घालण्यात आलेली पाईप तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी मंदिरासमोरील बाजूच्या काँग्रेस रोडवर दीड फूट पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी प्रयत्न झाला. पण येथील पाईप पाण्याखाली गेली असल्याने अडचण निर्माण झाली होती. परिणामी दुभाजकाच्या बाजूने मिलिट्री महादेव रोड कॉर्नरपासून गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्यावर पाणी साचून होते. या पाण्यामधून दुचाकीस्वारांना जाणे अवघड बनले होते. चार चाकी वाहनधारकही पाण्यामधून वाहने घेऊन जाण्यास घाबरत होते. त्यामुळे एकाच बाजूच्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. या ठिकाणी काँग्रेस रोडला स्वीमिंग पूलचे स्वरुप आले होते. याची दखल घेऊन सोमवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने दुभाजक फोडून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिलिटरी महादेव मंदिरसमोर तीन ठिकाणी जेसीबीने दुभाजक फोडण्यात आला. पण पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचे दुभाजक फोडण्यासाठी ड्रील मशीनचा वापर करावा लागला. दुपारनंतर ड्रील मशीनने दुभाजक फोडून साचलेले पाणी जाण्यासाठी मार्ग करण्यात आल्याने रस्त्यावरील पाणी कमी झाले. पण पावसाळय़ात ही समस्या पुन्हा निर्माण होण्याची शक्मयता असल्याने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.