प्रतिक्विंटल 500 तर बटाटा 400 रुपयांनी वाढला : महाराष्ट्रातून मागणी अधिक
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा दर प्रति क्विंटलला 500 रुपयांनी तर बटाटा दरात 400 रुपयांनी वाढ झाली आहे. रताळी आणि भाजी मार्केटमधील भाजीपाल्यांचा भाव स्थिर आहे.
महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. संपूर्ण देशाला पुरेल इतके पीक महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. संपूर्ण देशामधील बाजारात कांदा विक्रीसाठी महाराष्ट्रातून जात आहे. परतीच्या पावसामुळे कांद्याचे पहिल्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरे पीक एक महिन्यानंतर काढणीला प्रारंभ होणार आहे. यामुळे कांद्याला मागणी अधिक प्रमाणात आहे. आवक कमी येत असल्यामुळे कांद्याचा भाव प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढला.
इंदोर बटाटय़ाला देखील देशामधील इतर बाजारपेठेमधून मागणी येत आहे. परतीच्या पावसामुळे इंदोर बटाटय़ाचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात घट झाली आहे. इंदोर बटाटय़ाला परराज्यामधून मागणी वाढल्याने बटाटा भाव देखील प्रति क्विंटलला 400 रुपयांनी वाढला आहे.
बेळगाव तालुका व जिल्हय़ामधून भाजीपाला आवक मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी भाजी मार्केटला येत आहे. ढब्बू मिरची, मिरची, बटका मिरची, मटर आदी पालेभाज्या, मुंबई, आणि मध्यप्रदेशमधून विक्रीसाठी येत आहेत. भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी नितीन मुतगेकर यांनी दिली.
शनिवारी बाजारात इंदोर बटाटा 12 ट्रक, आग्रा बटाटा दोन ट्रक, तळेगाव बटाटा एक ट्रक, महाराष्ट्र कांदा 50 ट्रक, कर्नाटक कांदा दोन ट्रक, रताळय़ाची 700 पोती आवक जवारी बटाटय़ाची 400 पोती आवक झाली असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
सध्या तालुक्यातील राकसकोप, तुडये, बेळगुंदी, ढेकोळी, सोनोली, बेळवट्टी, किणये, बेळवट्टीसह चंदगड तालुक्यातील नवीन जवारी बटाटा विक्रीसाठी येत आहे.
महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1500 ते 2200 रु.
- मीडियम.. 2500 ते 3200 रु.
- मोठवड…. 3200 ते 3500 रु.
- गोळी…… 3500 ते 3800 रु.
- कर्नाटक कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1000 ते 1800 रु.
- मीडियम.. 2000 ते 2500 रु.
- मोठवड…. 2500 ते 3000 रु.
- गोळा…… 3000 ते 3200 रु.
- पांढरा कांदा 1500 ते 2800 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची 600 ते 650 रु.
- इंदोर ढबू मिरची 400 ते 500 रु.
- बिन्स…… 200 ते 250 रु.
- कारली…. 500 ते 550 रु.
- दोडकी…. 450 ते 500 रु.
- कोबी…… 160 ते 180 रु.
- इंग्लिश गाजर 300 ते 320 रु.
- भेंडी…….. 300 ते 350 रु.
- बिट…….. 300 ते 320 रु.
- जवारी काकडी 250 ते 300 रु.
- पांढरी काकडी 100 ते 120 रु.
- आले नवीन 200 ते 220 रु.
- मटार…… 400 ते 420 रु.
- मिरची….. 650 ते 700 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे 400 ते 500 रु.
- दुधी भोपळा डझन 100 ते 150 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी…… 500 ते 600 रु.
- मीडियम.. 1200 ते 1600 रु.
- मोठवड…. 1800 ते 2000 रु.
- गोळा…… 2000 ते 2200 रु.
बटाटा भाव प्रति क्विंटल
- इंदोर…… 1500 ते 1700 रु.
- आग्रा……. 1200 ते 1400 रु.
- तळेगाव… 1000 ते 1200 रु.
- रताळी…. 1700 ते 2000 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…….. 400 ते 500 रु.
- शेपू……… 400 ते 500 रु.
- पालक….. 200 ते 300 रु.
- कांदापात. 200 ते 250 रु.
- लाल भाजी…………….. 300 ते 400 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 500 ते 600 रु.
- बेळगाव कोथिंबीर 300 ते 400 रु.