प्रतिनिधी / शिराळा
कांदे येथील लोकनियुक्त महिला सरपंच सौ. सुवर्णा बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव अपील करण्यात आला होता. या आपीला नुसार शुक्रवार दिनांक 24 रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. एकूण 1039 मतदान झाले. विद्यमान सरपंच सुवर्णा पाटील यांना 229 तर त्यांच्या विरोधात 792 मध्ये पडली. 18 मते बाद ठरली. यानुसार सरपंच सुवर्णा पाटील यांच्या विरोधात अपील करण्यात आलेला अविश्वास ठराव बहुसंख्य मताने मंजूर झाला आहे.
उपसरपंच शशिकांत पाटील तसेच सदस्य विश्वास पाटिल, संग्रामसिंह पाटील, गजानन पाटील, विश्वनाथ पाटील, सौ अर्चना पाटील, सौ माधुरी पाटील, सौ मनीषा कुंभार, सौ अर्चना कुंभार, सौ विमल कुंभार, सौ. शशिकला कांबळे यांनी सरपंच मनमानी कारभार करत आहेत, कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत , सरपंच कर्त्यव्यात कसूर करतात व सरपंच यांचे पती अनधिकृतपणे ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, गावाच्या विकासात निरुत्साह दाखवतात तसेच धनादेश जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतात. त्यामुळे अविश्वास ठराव मांडू इच्छितो असे तहसीलदार यांना गुरुवार, 12 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव तहसीलदार यांचेकडे दाखल केला होता. याबाबत ग्रामपंचायतची सभा बोलाविण्यात आली होती. तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा पार पडली. यामध्ये हा ठराव 11 विरुद्ध 1 मंजूर करण्यात आला होता.
लोकनियुक्त सरपंच असलेने खास ग्रामसभा घेऊन अंतिम निर्णय घेण्यात आला.यावरून आज शुक्रवारी दि. 25 रोजी मतदान घेऊन 1039 मतदारांनी मतदान केले. यापैकी लोकनियुक्त सरपंचांना 229 तर अविश्वास ठरावाला 792 मतदान झाल्याने लोकनियुक्त सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे वेळ महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडली आहे.
कांदे ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय काँग्रेस युतीचे 8 तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. सरपंच सौ. पाटील या भाजपा पक्षा मधून निवडून आल्या आहेत. असे असताना विद्यमान सरपंच यांच्या पक्षातीलच अनेक सदस्यांनी त्यांच्या विरोधात उठाव केला. सरपंच यांच्या विरोधात उठाव करणाऱयांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आदी सर्वच पक्षातील सदस्य मंडळींचा सहभाग राहिला. सरपंच अविश्वास ठरावासाठी सर्व जण एकत्र आले आहेत. या अविश्वास ठरावाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी शिराळा तहसीलदार गणेश शिंदे निरीक्षक म्हणून तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल आदींनी कामकाज पाहिले.
राज्यातील एकमेव घटना
शिराळा तालुक्यातील कांदे येथील महिला सरपंच यांच्या पतीचे ग्रामपंचायत कामकाजात अनाधिकृतपणे हस्तक्षेप, सदस्यांना विश्वासात घेऊन काम न करणे आदी कारणावरून उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंच यांचेवर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला. मतदान प्रक्रियेत बहुसंख्य मताने अविश्वास ठराव मंजूर झाला. ही घटना महाराष्ट्र राज्यात एकमेव कांदे (ता. शिराळा) येथे आहे.