प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहण्याचे भाग्य लाभलेल्या अनगोळ महिला मंडळाच्या सदस्या विजया दीक्षित यांचा काकडे फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाने डिसेंबरमध्ये अनेक महिलांचा सत्कार केला. मात्र त्यावेळी अनुपस्थित असलेल्या विजया दीक्षित यांचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा आपटे, उपाध्यक्षा निलिमा गाडगीळ, उज्ज्वला काकडे व मंगल हेब्बाळकर यांच्या हस्ते शाल, फळ करंडी, सन्मानपत्र, विवेकानंद शिलास्मारक पुस्तिका व गीतोपदेश पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनघा दीक्षित उपस्थित होत्या.