मोठय़ा प्रमाणात पाणी वाया : आज पाईपलाईनची दुरुस्ती
वार्ताहर /काकती
होनगा-काकती मार्कंडेय जुन्या नदी पुलावर पाणीपुरवठा करणाऱया एचडी पाईप वाहिनीला गळती होऊन मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात होते. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गळती पाहण्यासाठी प्रवासीवर्गाची गर्दी झाली होती.
होनगा औद्योगिक वसाहतीतील बहुग्राम योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प योजनेतून एच. डी. प्लास्टिक पाईपची वाहिनी घालण्यात आली आहे. येथील जुन्या नदी पुलावर ही गळती निर्माण झाली असून कारंज्याप्रमाणे पाणी वाया जात होते. तासाभरात पाटबंधारे खात्याचे अभियंते मेहबूब यांनी उपस्थित राहून लागलीच पाहणी केली. वाया जाणारे पाणी तात्पुरते बंद करण्यात आले.
गुरुवारी गळती होणारी पाईपलाईन जोडून देणार असल्याचे अभियंते मेहबूब यांनी यावेळी सांगितले.
चार विभागात पाणी पुरवठा
या पाईपलाईनद्वारे काकती, गौंडवाड, कंग्राळी बुद्रुक, वैभवनगर आदी ठिकाणी पाण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यावेळी काकती, होनगा ग्राम पंचायतीच्या सदस्य व कर्मचाऱयांनी भेट दिली. सध्या तात्पुरती गळती बंद करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी फुटलेले पाईप बदलून दुरुस्ती करण्यात येणार आहे.