वार्ताहर/ काकती
काकतीत ग्राम पंचायतीच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या 60 टक्के मतदान झाले होते. एकूण 12,155 मतदारांपैकी 8,778 मतदारांनी मतदान केले. 72 टक्के मतदान झाले असून वॉर्ड क्र. 10 सर्वाधिक 88 टक्के मतदान झाले आहे. तर सोन्नट्टी वॉर्ड क्र. 12 मध्ये देखील 87 टक्के मतदान झाले आहे. तर वॉर्ड क्र. 1 मध्ये 4 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. यामुळे उमेदवारांची गर्दीच मतदारांना मतदान करण्यासाठी जाताना करत असल्याचे चित्र दिसून आले होते. अनेक वयस्क मतदानाला आले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काकतीतील मतदान केंद्राना दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक अधिकारी संदीप सजी साहाय्यक निवडणूक अधिकारी अरुणनाथ बुवा, तलाठी प्रकाश गमाणी व पोलीस अधिकाऱयांनी मतदानाच्या सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. काकती निवडणूक यंत्रणेचे कामकाज चांगल्या रितीने पार पडले असून 30 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या निकालाकडे वेधले आहे.