काकती : काकती ग्राम पंचायतीच्या शनिवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सुनील बाबुराव सुनगार यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत वर्षा लक्ष्मण मुचंडीकर विजयी झाल्या आहेत.
काकती ग्राम पंचायतीत सोनट्टी गावचा समावेश असून 37 ग्राम पंचायत सदस्य असून यापैकी 36 ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्षा मुचंडीकर यांना 23 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी ज्योती दीपक गवी यांना 8 मते व मिलन सूरज सोनुलकर यांना 5 मते मिळाली
आहेत.
गावच्या पुढाऱयांकडून बिनविरोध निवड करण्यासाठी लक्ष्मीदेवी मंदिर कट्टय़ावर बैठक बोलाविली होती. मात्र, नूतन ग्राम पंचायत सदस्यांचे बिनविरोध करण्यासाठी एकमत झाले नसल्याने बैठक फिसकटली होती. निवडणूक अधिकारी म्हणून पाणीपुरवठा खात्याचे अभियंता एस. आर. हंपीहोळी यांनी कामकाज पाहिले. निकाल घोषित करून ग्राम विकास अधिकारी रेवती शिंगे, सेपेटरी अरुण नाथबुवा, अकौंटंट अडव्याप्पा हावणगोळ आदींनी अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुष्पहार घालून अभिनंदन केले. सदस्य, ग्रामस्थांनी गुलालाची उधळण व फटाक्मयांची आतषबाजी करून आनंद द्विगुणित केला.