बेळगाव : कोरोना काळात सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. अशा या काळामध्ये प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. त्याच माणुसकीतून धर्मस्थळ-मंजुनाथ स्वसाहाय्य संघ यांच्यावतीने काकती येथे जीवनावश्यक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. सिध्देश्वर मंगल कार्यालयात याचे वितरण करण्यात आले. 50 महिलांना हे साहित्य देण्यात आले. योजनाधिकारी प्रभाकर नाईक, तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य बसवराज गाणगेर, सतीश, बसवाणेव्वा जरळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. धर्मस्थळ स्वसाहाय्य संघाच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. काकती परिसरातील गरीब कुटुंबांची नोंद करुन त्यानंतर साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. या कार्याबद्दल धर्मस्थळ संस्थेचे कौतुक होत आहे.
Previous Articleबेन्नाळी येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रोप वितरण
Next Article कोरोना महामारीमुळे बुरुड समाज सापडला आर्थिक संकटात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.