जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा मागील वषी कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. तरी यावषी ही यात्रा साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी काकती येथील श्री सिद्धेश्वर मंदिर मंडळातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाचे नियम पाळत आम्ही ही यात्रा साजरी करण्याचे आश्वासन दिले आहे. मंगळवार दि. 13 पासून 17 एप्रिलपर्यंत ही यात्रा होणार आहे. या काळात मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्या सर्वांना मुभा द्यावी. श्री सिद्धेश्वर देवस्थान हे अत्यंत जागृत देवस्थान आहे.
या यात्रोत्सवाला बेळगाव तालुक्मयाबरोबरच जिह्यातून मोठय़ा प्रमाणात भक्त येत असतात. तेव्हा ही यात्रा साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात रात्रंदिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. अंबिल-गाडे, इंगळय़ा यासह इतर विधी पार पडणार आहेत. तेव्हा त्याचा विचार करून आम्हाला यात्रा साजरी करण्यास मुभा द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. प्रांताधिकारी अशोक तेली यांनाही निवेदन दिले.
यावेळी श्री सिद्धेश्वर मंडळाचे अध्यक्ष संदीप मुंगारी, उपाध्यक्ष सिद्धाप्पाण्णा टुमरी, तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, बाबू पिंगट, आर. के. कडोलकर, माजी अध्यक्ष नारायण होळी, शिवाजी नरेगावी, लक्ष्मण पाटील, भावकाण्णा टुमरी, देसाई, चन्नाप्पा पुराणिकमठ, बसवराज गाणगेर, बसय्या हिरेमठ, कलखांबकर यांच्यासह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.