नियमांचे उल्लंघन करणाऱया, विनामास्क फिरणाऱयांना दंडुक्मयांचा मार : दुचाकीस्वारांना दंड
वार्ताहर / काकती
काकती, होनग्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाची साखळी थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी स्वयंप्रेरणेने करावी, असे आवाहन काकती मंडळ पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र, जाणीवपूर्वक सर्व्हीस रस्त्यावरून येरझाऱया घालणाऱयांना दंडुक्मयांचा मार खावा लागत आहे. प्रसंगी टू व्हीलर गाडय़ा पकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
काकती येथे शुक्रवारी सकाळी दहानंतर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हीस रस्त्यावर स्थानिक नागरिक, युवावर्गाची वर्दळ चालू होती. रहदारी वाढली असल्याने देसाई गल्ली प्रवेशद्वार व सिद्धेश्वर मंदिर जवळील प्रवेशद्वार व लक्ष्मीनगर प्रवेशद्वारापाशी काकती पोलिसांनी कडेकोट पहारा ठेवला होता. तर होनगा सर्व्हीस रोड बसस्थानकाजवळ पोलिसांचा बंदोबस्त होता. या ठिकाणी मार्गक्रमण करणाऱया टू व्हीलर, फोर व्हीलर गाडय़ांची तपासणी करण्यात येत होती.
कोणत्या कामासाठी चालला आहात? त्या कामाच्या ओळखपत्राची शहानिशा, शिवाय मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक, मास्कशिवाय फिरणाऱयांवर दंडुक्मयांचा मार खावा लागत होता. तसेच अरेरावीची भाषा बोलणाऱयांच्या गाडय़ा पकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. काकती पोलीस स्थानकाचे फौजदार संगमेश्वर, सेंट्रल ब्युरोचे एस. आर. नायकवाडी, बसवराज लमाणी, महिला पोलीस एच. एच. खान, कॉन्स्टेबल शिवानंद दड्डी, जे. आय. रुटकुटे व इतर पोलीसवर्ग सेवा बजावत होता.
यावेळी काकती पोलीस विभागाचे सीपीआय एस. पी. कुमारस्वामी हे काटेकोर नियोजन करण्यात सतर्क होते. यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, कोरोनाची साखळी थोपविण्यासाठी प्रत्येकाने स्वयंप्रेरणेन नियमांचे पालन करावे. मंदिर, मशीद, लग्न सोहळय़ात नियमांचे पालन करावे. मुस्लीम बांधवांचा रोजा असल्याने घरातूनच नमाजपठण करावे. प्रत्येकाने जीवन निरामय जगणे महत्त्वाचे आहे. याकरिता नियमांचे उल्लंघन करणाऱयांची गय केली जाणार नाही, असे सांगितले.